पारनेरमध्ये शिवसेनेचे विजय औटी, राष्ट्रवादीच्या नीलेश लंके यांच्यात सरळ लढत


वेब टीम : अहमदनगर
पारनेर नगर २२४ विधानसभा मतदारसंघात सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी ९ पैकी ३ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुधाकर भोसले व साहय.अधिकारी ज्योती देवरे यांनी दिली आहे.

या पारनेर नगर विधानसभा मतदार संघात संदेश कार्ले, सुजित झावरे व वसंतराव चेडे या तीन अपक्षांनी माघार घेतली आहे.

या तीनही अपक्षांना थोपविण्यासाठी खासदार सुजय विखे पाटील व शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी झावरे कार्ले व चेडे यांची मनधरणी करत उमेदवारी मागे घेतली आहे.

त्यामुळे या बंडखोरी केलेल्या उमेदवारांची मनधरणी केल्याने शिवसेनेचे बंडखोर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, भाजपा बंडखोर उमेदवार माजी जि.प.सदस्य वसंतराव चेडे तर राष्ट्रवादीचे युवा नेते व भाजपाच्या गोटात सामिल झालेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी निवडणुकीतुन माघार घेतली आहे.

या मतदार संघात ४ ऑक्टोबर पर्यंत ९ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी शनिवारी छाणणीमध्ये अर्ज मंजुर करण्यात आले होते.

सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी पारनेर नगर २२४ विधानसभा मतदार संघात विजय भास्करराव औटी (शिवसेना – भाजपा मित्रपक्ष), निलेश ज्ञानदेव लंके (राष्ट्रवादी काँग्रेस- काॅग्रेस), भाऊसाहेब माधव खेडकर (अपक्ष), दगडु रामजी शेंडगे (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद बापु खामकर(जनता पार्टी), जितेंद्र ममता साठे (बहुजन समाज पार्टी) या ६ उमेदवारांचा सामावेश यामध्ये आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post