अकोल्यात वैभव पिचडांचे पानिपत; राष्ट्रवादी किरण लहामटे झाले आमदार


वेब टीम : अहमदनगर
अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला. लहामटे यांना ९९ हजार ४४० मते मिळाली, तर पिचड यांना ४८ हजार ६०६ मतांवर समाधान मानावे लागले.

पिचड यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पिचड विरोधावर राजकारण असलेल्या लहामटे यांनी पिचड विरोधकांना एकत्र आणत एकास एक उमेदवार दिला. 

शरद पवारांनी अकोल्यात सभा घेत पिचडांना धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त मतांनी पिचडांचा पराभव झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post