उद्धव ठाकरे- अमित शहांची फोनवरून चर्चा; युतीबाबत मोठा निर्णय


वेब टीम : मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी खुद्द उद्धव ठाकरे यांना फोन करून या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडुन आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

तसेच दिवाळीनंतर दोन्ही नेत्यांची नव्या सरकार स्थापने पुर्वी बैठक देखील घेणार असल्याचे सांगितले. या बैठकीत नवीन सरकारच्या स्वरूपाबाबत निर्णय घेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

निकालानंतर शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत बोलतांना भाजपला ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण ही करून दिली.

त्याचबरोबर त्यांच्या काही अडचणी असतील तर शिवसेना आता त्या समजून घेऊ शकणार नाही. मला माझा पक्ष चालवायचा आहे, अश्या शब्दांत इशारा दिला आहे.यामुळे दिवाळी नंतर भाजपसोबत होणाऱ्या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नव्या भाजप-शिवसेना युती सरकारची स्थापना ही दिवळीनंतरच होईल. असे स्पष्ट संकेत आज मिळाले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post