२५ वर्षे आमदार राहिलेल्या शिवाजी कर्डिलेंचा प्राजक्त तनपुरेंकडून दारुण पराभव


वेब टीम : अहमदनगर
नगर जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल राहुरी मतदार संघात लागला असून २५ वर्षापासून आमदारकी भूषविणारे भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी सुमारे २२ हजार हुन अधिक मतांनी धक्कादायक पराभव केला आहे.

विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचे वडील मा. आ प्रसाद तनपुरे यांचा २००९ आणि प्राजक्त यांच्या मातोश्री सौ. उषाताई तनपुरे यांचा २०१४ साली कर्डिले यांनी पराभव केला होता. आई – वडिलांच्या या दोन पराभवांचा प्राजक्त तनपुरे यांनी २०१९ ला कर्डिंलेंचा पराभव करुन एकप्रकारे वचपा काढल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला आपण लाख मताधिक्क्याने निवडून येवू, असा आत्मविश्वास कर्डिले यांना होता. मात्र त्यांचा हा आत्मविश्वास फोल ठरला.

राहुरी तालुका व शहरात झालेल्या सुमारे सव्वा लाख मतदानापैकी तव्वल ८० हजार मतदान तनपुरेंना पडले . जवळपास ४० हजाराचा लिड राहुरी तालुक्यातून मिळाल्याचे दुपारपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून आले. कर्डिले १० वर्षापासून राहुरी मतदार संघाचे आमदार होते. तत्पूर्वी नगर – नेवासा मतदार संघातून ते १५ वर्ष आमदार होते. असे २५ वर्ष आमदार राहिलेल्या कर्डिलेंचा पराभव हा जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक पराभव मानला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post