आदित्य ठाकरेंचा बांधावर बसून शेतकऱ्यांशी संवाद


वेब टीम : रत्नागिरी
आमदार आदीत्य ठाकरे यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची शेतात जाऊन पाहणी केली.

निवजे येथे त्यांनी शेतीच्या बांधावर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कसलीही चिंता करू नका, मनात वाईट विचार आणू नका, घाबरून जाऊ नका, नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

शिवसेना सदैव तुमच्यासोबत आहे. कधीही हाक मारा, शिवसेना तुमच्या मदतीसाठी निश्चितच धावून येईल असा विश्वास आदीत्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अवकाळी पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदीत्य ठाकरे रविवारी कोकण दौऱ्यावर आले होते.

यावेळी त्यांनी कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डेमार्गे निवजे येथे जात निवजे व माणगाव येथील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी शेताच्या बांधावर जाऊन केली.

उपस्थित अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

निवजे देऊळवाडी व माणगाव बेनवाडी येथे आदित्य ठाकरे यांनी भातशेतीची पाहणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates