बाप रे ! तब्बल २०० फूट खोल दरीत मोटार कोसळली


वेब टीम : श्रीनगर
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर समरोली येथे शनिवारी रात्री दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला.

यात तीनजण जागीच ठार झाले तर, सातजण गंभीर जखमी झाले.रात्री उशिरा बकरवाल समुदायातील नागरिकांसह शेळ्या-मेंढ्यांनी भरलेला ट्रक २०० फूट दरीत कोसळला.

या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षा दलांनी लगेच बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले.त्यांना उधमपूरच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचवले.

मात्र, जखमींची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना जम्मूमधील जीएमसीमध्ये पाठवले. पोलिसांनी या प्रकरणी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

बकरवाल समुदायातील लोक उन्हाळा सुरू झाल्यानंतर त्यांचे सामान आणि पाळीव जनावरांसह डोंगराळ प्रदेशात निघून जातात. डोंगराळ भागात थंडी सुरू झाल्यानंतर ते त्याहून उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post