दिल्लीत प्रदूषणामुळे विमानसेवा विस्कळीत


वेब टीम : दिल्ली
दिल्लीत प्रदूषणाची पातळी दिवसेंसदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ३२ विमानांचे मार्ग बदलावे लागले.

प्रदूषणामुळे हवा धुरकट झाली आहे. त्यामुळे विमानाच्या उड्डाणास अडचणी येत आहेत. विमानसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

दिवाळीत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके उडवल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली.

त्याबरोबरच दिल्ली शेजारच्या हरयाना, उत्तर प्रदेश राज्यामध्ये शेतकरी पिकांचा टाकाऊ भाग पेटवल्याने प्रदूषणात भर पडली.

शेतकर्‍यांनी शेतामध्ये आगी लावू नये म्हणून दिल्ली सरकारने हरयाना आणि उत्तर प्रदेश सरकार विनंती केली.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये हवेचा स्तर ६२५ निर्देशांकावर पोहोचला आहे.

 मात्र, हवेचा स्तर ९०० निर्देशांकापर्यंत पोहचला असल्याची चर्चा आहे. प्रदूषणाचा जोर कमी होण्यासाठी पुढील सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post