अजित पवारांनी दिला राजीनामा; फडणवीस सरकारवर नामुष्की

PTI

वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या बुधवार 5 वाजेपर्यंतचा कालावधी दिला आहे. मात्र पवारांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकारवर नामुष्की ओढवली आहे.

भाजप आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप हा झाला आहे.

राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्यामुळे उद्या बुधवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा पेच भाजपसमोर उभा राहिला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post