पंतप्रधान मोदीजी धन्यवाद, आम्ही स्थिर सरकार देऊ : अजित पवार


वेब टीम : मुंबई
अजित पवार यांनी मात्र ट्विटरद्वारे आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व इतर प्रमुख भाजप नेत्यांचे आभार मानत स्थिर सरकार येण्याची खात्री दिली आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नाहीत. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी त्यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले.

त्यातच रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील व जयंत पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. अजित पवार स्वगृही परतणार का याची चर्चा जोरात होती.

राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवारांसोबत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता होती.

परंतु शनिवारी संध्याकाळपर्यंत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत असल्याचं सांगितलं.

राष्ट्रवादीने अजित दादांना गटनेतेपदावरुन हटवत त्यांच्याजागी जयंत पाटील यांची निवड केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post