कुख्यात बगदादीची बहीण तुर्की सैनिकांच्या ताब्यात


वेब टीम : अझाज
अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झालेला आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी याच्या बहिणीला सीरियाच्या उत्तरेतून तुर्कस्तानच्या सैनिकांनी ताब्यात घेतल्याचे मंगळवारी एका अधिकाऱ्याने सांगितले.

अझाझ शहराजवळ तुर्कीच्या सैनिकांनी छापा टाकून बगदादी याच्या बहिणीला ताब्यात घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बगदादीच्या बहिणीचे नाव रासमिया अवाद असे आहे. रासमिया हिच्यासमवेत तिचा पती, सून आणि पाच मुले असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

ताब्यात घेतलेल्यांपैकी तिघांची सध्या कसून चौकशी होत आहे. रासमिया हिला आयसिसबद्दल कितपत माहिती आहे याची चाचपणी केली जात आहे.

तिच्याकडून ठोस माहिती मिळाल्यास या संघटनेच्या दहशतवाद्यांना पकडण्यास मदत होऊ शकते,असेही हा अधिकारी म्हणाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post