समुद्र खवळणार : 'बुलबुल'ची तीव्रता वाढली


वेब टीम : मुंबई
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या बुलबुल चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. हे वादळ सध्या उत्तर दिशेने पश्चिम बंगाल आणि बांगलादेश जवळ पोहोचले आहे.

त्यामुळे पुढील काही दिवस उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर समुद्र खवळणार असल्याचे संकेत आहेत.
आज मध्य भारतात चक्रवाती परिस्थितीमुळे दक्षिण गुजरात, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

बुलबुलची तीव्रता वाढल्यामुळे पुढील काही दिवसांत उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेशात जोरदार ते मुसळधार तर ओडिशा, मणिपूर, मिझोराम, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

बुलबुलचा प्रभाव राज्यातील वातावरणावर पडणार नाही, मात्र पुढील तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलका पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

मागील २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला, तर किमान तपमान घटल्यामुळे कोकण आणि विदर्भात गारवा वाढला आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तपमान नगर येथे १४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post