मुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट


वेब टीम : नागपूर
भाजपा आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. या संदर्भात देवेन्द्र फडणवीस यांनी काल भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

त्यांच्यात काय बोलणी झाली याचा तपशील कळू शकला नाही. मात्र सरकारस्थापनेच्या शक्यतांबाबत चर्चा झाली असा कयास लावण्यात येतो आहे.

त्यानंतर शिवसेनेच्या एका नेत्याने सरसंघचालक मोहनजी भागवत यांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा वाद नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली.

त्यानंतर आज रात्री फडणवीस नागपूरला आले आणि विमानतळावरून थेट संघ कार्यालयात जाऊन मोहनजींची भेट घेतली.

फडणवीस यांनी आज (५ नोव्हेंबर) रोजी नागपूरच्या संघ कार्यालयात जाऊन सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेतली. त्यांची चर्चा सुमारे १ तासापेक्षा जास्त वेळ चालली होती.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post