आम्ही सांगू तोच होणार मुख्यमंत्री : आठवले


वेब टीम : नाशिक
भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक १०५ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले असते तर आम्ही स्वत:च त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला असता.

शिवसेनेकडे १६, भाजपकडे २३ आणि अन्य मित्रपक्षांना चार मंत्रिपदे असा फॉर्म्युला असून शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.

मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही सांगू तोच, म्हणजेच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,असेही त्यांनी ठणकावले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आठवले नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.

त्यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्याबाबत आठवले यांनी वक्तव्य केले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. परंतु, त्यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले.

आठवले म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजप दोघांनाही एकमेकांसोबत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत येईल, असा मला विश्वास आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे अशक्य आहे. काँग्रेस आघाडीसोबत जाणे शिवसेनेला परवडणारे नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post