दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, पेच सुटणार की नाही?


वेब टीम : दिल्ली
राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच कधी सुटणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ह्यांची भेट घेतल्यानंतर सत्तास्थापनेबाबत चर्चा न झाल्याची गुगली टाकली होती.

त्यानंतर मंगळवारी होणारी आघाडीच्या नेत्यांची बैठक रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, ही बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी घेण्यात आली.

बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यासह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.

या बैठकीनंतर नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब होणार का या कोड्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांनी पक्ष मुख्यालयात अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.

तर बुधवारी सकाळी राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत व शरद पवार यांच्यात काही मिनिटे चर्चा झाली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post