दारू पिण्यास पैसे दिले नाही; व्यापार्‍यास बेदम मारहाण


वेब टीम : अहमदनगर
दारू पिण्यास पैसे न दिल्याने त्याचा राग येऊन दोघांनी 45 वर्षीय व्यापार्‍यास लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.18) सकाळी 9.30 च्या सुमारास जुना दाणेडबरा, ग्राहक भांडार चौक, दाळमंडई येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अंबिका गुडस् ट्रान्सपोर्ट, जुना दाणे डबरा, ग्राहक भांडार चौक, दाळमंडई जवळ येथे महेंद्र कांतीलाल भंडारी (वय 45, रा. रेल्वे स्टेशन रोड, नगर) हे त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना तेथे सलमान उर्फ मायकल बाबा शेख (रा. बेलदार गल्ली) व त्याच्या समवेत एक अनोळखी इसम असे दोघे भंडारी यांच्याकडे आले.

त्यांनी दारू पिण्यासाठी भंडारी यांना पैसे मागितले. मात्र सकाळी सकाळी पैसे देण्यास भंडारी यांनी नकार दिला. याचा राग आल्याने शेख व त्याच्या साथीदाराने भंडारी यांना लाकडी काठीने बेदम मारहाण केली.

मारहाण करीत असताना शिवीगाळ करीत जीवे ठार मारहण्याचीही धमकी दिली. यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडुन मोबाईल फुटला व त्याचे नुकसान झाले. दोघांनी दुकानातील सिसीटिव्ही कॅमेराही फोडुन नुकसान केले.

या मारहाणीत भंडारी जखमी झाले असुन त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. या मारहाणीमुळे बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी महेंद्र भंडारी यांच्या फिर्यादीवरून भादंविक 324, 323, 504, 506, 424 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक के.बी. घायवट हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post