कोयत्याचा दाखवला धाक; ५६ हजारांची लूट


वेब टीम : अहमदनगर
कोयत्याचा धाक दाखवत तिघांनी दोघांना 56 हजाराला लुटल्याची घटना येथील बालिकाश्रम रोडवरील कृषी कार्यालयाजवळ घडली. ही घटना रविवारी (दि.24) रात्री घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, गणेश राधाकिसन भुस्सा (वय 43, रा. भिंगारदिवे मळा, भुतकरवाडी, सावेडी) हे त्यांच्या मित्रासमवेत कार (क्र. एम एच 16 बी एच 5849) मधुन निघाले असता लघुशंकेसाठी मॅक्सकेअर हॉस्पिटलजवळ थांबले.

त्यावेळी तेथे 3 अनोळखी इसम आले. तुम्ही येथे लघुशंका का केली? यावर वाद घालुन त्यांना धक्काबुक्की केली.

भुस्सा हे माफी मागत तेथुन पुढे गेले असता या तिघांनी त्यांचा बालिकाश्रम रोडवरील एस्सार पेट्रोलपंपापर्यंत मोटारसायकलने पाठलाग केला व त्यांची गाडी थांबवुन तुम्ही तेथे लघुशंका का केली? असा परत वाद घालुन आमच्या मालकाने सीसीटिव्ही कॅमेर्‍यात पाहिले, तुम्हाला घरी बोलावले आहे, असे सांगत दोघांना गाडीत बसवले व महालक्ष्मी उद्यानाजवळुन कृषी कार्यालयाजवळ नेले.

तेथे गाडी थांबवुन सोबत असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीतुन कोयत्यासारखे हत्यार काढुन गाडीच्या टपावर मारले.

दुसर्‍याने त्यावेळी हाताने मारहाण करीत भुस्सा यांच्याकडे असलेले 26 हजार 500 रूपयांची बॅग व 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढुन घेत तेथुन पोबारा केला.

याप्रकरणी राधाकिसन भुस्सा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीसांनी भारतीय दंड विधान कलम 392, 323, 506, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post