छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार


वेब टीम : दंतेवाडा
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण येथे झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला.

ही चकमक ‘डीआरजी’ (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) चे पथक आणि नक्षलवाद्यामंध्ये सकाळी झाली.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे.

जवानांकडून होत असलेल्या या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून काहीजण आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत.

तर काहीजण आपला रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांवर हल्ले करत असल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post