वेब टीम : नागपूर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना नागपूरच्या स्थानिक कोर्टाने समन्स बजावला आहे. कोर्टाच्यावतीने नागपूर पोलिसांनी ...
वेब टीम : नागपूर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना नागपूरच्या स्थानिक कोर्टाने समन्स बजावला आहे. कोर्टाच्यावतीने नागपूर पोलिसांनी हा समन्स फडणवीसांना दिला.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल दोन गुन्हेगारी खटल्यांचा उल्लेख लपवल्याप्रकरणी गुरुवारी (28 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होत असतानाच, देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी नोटीस पोहोचली.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात 1996 आणि 1998 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल केला होता.
COMMENTS