फिकीर नॉट; 'फास्टटॅग'साठी १५ दिवसांची मुदतवाढ


वेब टीम : दिल्ली
राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टटॅग बसवणे अनिवार्य आहे.

त्यास 15 दिवसांची मुदवाढ करण्यात आली आहे. एक डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून फास्टटॅग बंधनकारक आहे.

जास्तीत जास्त लोकांनी फास्टटॅग बसवावे हा मुदतवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे.

पाच दिवसात पाच लाख लोकांनी फास्टटॅग बसवून घेतले आहे. त्यामुळे सरकारने फास्टटॅग बसवण्याची मुदवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या वाहनांवर फास्टटॅगचे स्टिकर लावलेले आहेत, त्या वाहनचालकांसाठी विशेष लेन प्रत्येक टोल नाक्यावर असणार आहे.

केंद्र सरकारच्या 21 नोव्हेंबर 2014 च्या राजपत्रानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post