भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सुरूच; विकास दर ४.५ टक्क्यांवर


वेब टीम : दिल्ली
आर्थिक आघाडीवर भारतीय अर्थव्यवस्थेची पुन्हा पीछेहाट झाली आहे. देशाच्या विकासाचा वेग मंदावला असून दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटून ४.५ टक्क्यांवर पोहोचला.

विकास दर गेल्या सहा वर्षात सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्के होता.

या आकडेवारीवरून पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न केवळ स्वप्नच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारने शुक्रवारी संध्याकाळी हे आकडे जाहीर केले.आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत.

तरीही विकास दराला गती मिळालेली नाही. कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातही घट झाली आहे.

दुसऱ्या तिमाहीत मायनिंगमध्ये ०.१ टक्के, बांधकामात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्के, उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन एक टक्का,सेवा क्षेत्रात ७.३ टक्क्यावरुन ६.८ टक्क्यापर्यंत घट झाली.

विकास दरात सातत्याने घसरण होत असून बेरोजगारी वाढत आहे. बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्र अडचणीत आहे.विविध क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यानमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे.

जीडीपी दर घसरण्यासोबतच महसूल तूटही वाढली आहे. २०१८ ते २०१९ च्या पहिल्या ७ महिन्यात म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान महसूल तूट चालू आर्थिक वर्षात लक्ष्य ठेवले होते,त्यापेक्षा जास्त झाली आहे.

पहिल्या ७ महिन्यात महसूल तूट ७.२ ट्रिलियन रुपये (१००.३२ अब्ज डॉलर) राहिली, जी अर्थसंकल्पातील लक्ष्याच्या १०२.४ टक्के जास्त आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post