सत्ता स्थापन करून दाखवा; राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण


वेब टीम : मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. उद्या सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत हा दावा करावयाचा आहे.

भाजपने राज्यपालांना भेटून आपण सरकार स्थापन करू शकत नसल्याचा दावा केला होता. यानंतर शिवसेनेचा मतदारांची संख्या दुस-या क्रमांकावर आहे.

आता येथून खरी परीक्षा शिवसेनेची सुरु होणार आहे. कारण आता संजय राऊत वारंवार सांगत आहे की आमच्याकडे सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा आग्रह केला होता.

आता शिवसेना हे संख्याबळ कोठून आणि कसे आणेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post