वेब टीम : वॉशिंग्टन गुगलचा स्मार्टफोन ‘पिक्सल’ (Pixel) हॅक करणाऱ्यास गुगल १० कोटी ७६ लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉग...
वेब टीम : वॉशिंग्टन
गुगलचा स्मार्टफोन ‘पिक्सल’ (Pixel) हॅक करणाऱ्यास गुगल १० कोटी ७६ लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉगवर या संदर्भात माहिती दिली.
गुगल पिक्सलमध्ये सध्या Titan M चीप बसवली आहे. ही अत्यंत सुरक्षित समजली जाते.
जर एखाद्या हॅकरने हा फोन हॅक करून दाखवल्यास त्या व्यक्तीला गुगल तब्बल १.५ मिलियन डॉलर म्हणजेच १० कोटी ७६ लाख रुपये बक्षीस म्हणून देणार आहे.
टायटन एम (Titan M) हे स्मार्टफोनमधील सर्वांना सुरक्षा देण्याचे काम करतेय.सध्या हे सर्वात सुरक्षित समजले जाते.
फोनमध्ये ‘बील्ट इन सिक्युरिटी’ देण्यासाठी टायटन एमला सर्वात जास्त रेटिंग दिले आहे. आम्ही जाणीवपूर्वक यावर बक्षीस ठेवले आहे.
संशोधकांनी या फोनमध्ये काही तरी कमतरता शोधावी हा या मागचा उद्देश असल्याने आम्ही हे बक्षीस ठेवले आहे,असे गुगल कंपनीने स्पष्ट केले.
जर संशोधकांनी या फोनमध्ये काही कमी शोधल्यास त्याला बक्षीस देऊन आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वात चांगली सेवा देऊ, असेही कंपनीने म्हटले.
हे सर्व आम्ही आमच्या ग्राहकांसाठी करत असल्याचे कंपनीकडून स्पष्ट केले.
गुगलने अँड्रॉइड व्हर्जन हॅक करणाऱ्यावरही बक्षीस ठेवले आहे. आम्ही अँड्रॉयडसाठी काही खास प्रीव्ह्यू व्हर्जनसाठी एक स्पेशल प्रोग्राम लाँच करीत आहोत.
यात काही कमतरता शोधल्यास ५० टक्के रक्कम बोनस म्हणून दिली जाणार असल्याचे गुगल कंपनीने स्पष्ट केले. गुगलने आतापर्यंत १८०० रिपोर्ट्सला बक्षीस दिले आहे.
कंपनीने चार वर्षात तब्बल ४ मिलियन डॉलर बक्षीस म्हणून दिले. गेल्या १२ महिन्यात कंपनीने गुगलच्या सिस्टममध्ये बग शोधणाऱ्यास बक्षीस म्हणून १.५ मिलियन डॉलर म्हणजेच ११ कोटीच्या आसपास रुपये दिले आहेत.
COMMENTS