काँग्रेस- राष्ट्रवादीचं ठरलंय; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू देणार नाही


वेब टीम : मुंबई
राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी आज नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली.

यावेळी दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर दलवाई यांनी भाजपचं सरकार येणार नाही, असा दावा केला आहे.

दलवाई म्हणाले की, भाजपचे सरकार बनू नये, यासाठी कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा करुन मार्ग काढायला हवा.

भाजपने माहाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, मजूरांची, कारखान्यांची, शिक्षणाची, सामाजिक व्यवस्थेची, अर्थकारणाची वाट लावली आहे. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवायला हवे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यायची नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post