शुल्क वाढीविरोधात जेएनयूच्या शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा


वेब टीम : दिल्ली
हॉस्टेल शुल्कामध्ये भरमसाठ वाढ, ड्रेस कोड आणि संचारबंदी या विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने आंदोलन सुरू केले.

विद्यापीठाच्या परिसराबाहेर सोमवारी विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला. यांत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी येथे बरेच पोलीस देखील तैनात आहे. फ्रीडम स्वेअरपासून एआयसीटीई ऑडिटोरिअम पर्यंत निघालेल्या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी भरमसाठ शुल्क वाढीविरोधातील बॅनर्स झळकवले.

एका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने एएनआयशी बोलताना सांगितले,“गेल्या १५ दिवसांपासून आम्ही याविरोधात आंदोलन करीत आहोत.

मात्र, कुलगुरु आमच्याशी बोलण्यास इच्छुक नाहीत. विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर वसतिगृहाचे शुल्क वाढवले.


विद्यापीठातले ४० टक्के विद्यार्थी गरीब कुटुंबातून येतात. त्यामुळे विद्यापीठाचा हा शुल्क वाढीचा निर्णय अशा विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे.”

दुसऱ्या एका आंदोलक विद्यार्थ्याने सांगितले, “जेएनयू हे अनुदानित विद्यापीठ आहे त्यामुळे इथे गरीब विद्यार्थीही शिक्षण घेऊ शकतात.
 जर विद्यापीठ हॉस्टेलचे शुल्क ६ ते ७ हजार रुपयांच्यावर गेले असेल तर गरीब विद्यार्थी इथे कसे शिक्षण घेऊ शकतील?”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post