राज्यातील सत्तापेचावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय


वेब टीम : दिल्ली
महाराष्ट्रातील सत्तापेचाचा सस्पेन्स आणखी एक दिवस वाढला आहे. बहुमत चाचणी संदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालय 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता देणार आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनण्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोर्टाने सोमवारी (दि.25) रोजी प्रकरणाची सुनावणी करताना निकाल सुरक्षित ठेवला. तिन्ही पक्षांनी 23 नोव्हेंबर रात्री कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने 24 नोव्हेंबरला यावर तातडीची सुनावणी केली होती.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय पेचावर सर्वोच्च न्यायालयात सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या वकिलांनी यावर सुमारे दीड तास युक्तिवाद केला.

तुषार मेहता (राज्यपालांचे वकील), मुकूल रोहतगी (भाजपचे वकील), मनिंदर सिंह यांनी सरकारची बाजू मांडली तर कपिल सिब्बल (शिवसेनेचे वकील), अभिषेक मनु सिंघवी (राष्ट्रवादीचे वकील) यांनी विरोधी पक्षाकडून युक्तिवाद केला.

याप्रकरणी सविस्तर सुनावणीची गरज असल्याचं मुकूल रोहतगी यांनी सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्षच बहुमत चाचणी घेऊ शकतात, असं म्हणाले.

तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वकिलांनी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post