सगळे आमदार माझ्यासोबतच, फुटल्यास जागा दाखवू, भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार


वेब टीम : मुंबई
अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंद करून भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला आहे.

एकूण १०-१२ आमदार अजित पवार यांच्यासोबत असून त्यांच्यावर पक्षांतर बंदीच्या कायद्याने त्यांच्यावर कारवाईची शक्यता नाकारता येणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी राज्यातील सत्ता पेच सोडविण्यासाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी काल बैठक झाली. एका आमदाराने फोन करून आम्हाला राजभवनावर आणले असल्याचे समजले.

दरम्यान, अचानक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी केला. यावेळी अजित पवार यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप काही लोकप्रतिनिधींनी केला आहे.

काल रात्री बारा वाजता अजित पवार यांचा फोन आला, धनंजय मुंडे काही महत्वाच्या विषयावरबोलायचं आहे त्या बंगल्यावर गेलो. आठ ते दहा आमदार जमा झाले, आम्हाला मुंबईत चर्चा करायचा जायचय, त्यानंतर आम्हाला राजभवनात नेण्यात आलं. आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती..त्या ठिकाणी आपसात चर्चा केली .. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील याठिकाणी आले. त्यांनतर काही वेळातच राज्यपाल आले… पुढच्या अर्ध्या मिनटात शपथविधी झाला
आमदार शिंगणे सिंदखेडराजा

 ही लढाई पवार साहेबांबरोबर लढणार आहोत, पहाटे पहाटे शिवरायांच्या महाराष्ट्रावरती सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे, यापुढं आम्ही राष्ट्रवादी सरकारसोबत आहोत, तसेच देशाच्या घटनेवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे कोणतेही काम घटनेची विरोधात करणार नाही : उद्धव ठाकरे

आपल्या देशामध्ये लोकशाहीचा खेळ चाललंय, मी पुन्हा येईल पेक्षा, मी जाणारच नाही असाच व्हायला पाहिजे  आमचं राजकारण रात्रीस खेळ चाले सारखं नसून, उघड आहे, : उद्धव ठाकरे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post