मनसेच्या 'या' नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; अधिकाऱ्यांशी केले होते 'असे' वर्तन


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांच्यावर करण्यात आला आहे.

वॉर्ड ऑफीसरशी वाद घालतानाचा देशपांडे यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर गुरुवारी चांगलाच गाजला. याच प्रकरणात देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आले.

मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात दिवाळीनिमित्त रोषणाई करण्यात आली होती तसेच कंदीलही लावण्यात आले होते.

मुंबई महापालिकेने हे कंदील काढून कचऱ्यात टाकले. त्यावरुन संदीप देशपांडे आणि महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून देशपांडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post