नागरिकांना सिद्ध करावे लागणार भारतीयत्व; देशभरात लागू होणार ' हा' कायदा


वेब टीम : दिल्ली
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) मुद्द्यावरून विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना आज,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत उत्तर दिले.

धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल आणि ते संपूर्ण देशात लागू होईल,असे गृहमंत्री शहा यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही धर्माच्या नागरिकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही. देशातील सर्वच नागरिकांना एनआरसी यादीत स्थान देण्यासाठीची ही एक प्रक्रिया आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

‘एनआरसी’मध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही.अन्य धर्माच्या लोकांना यादीत स्थान नसल्याची कोणतीही तरतूद एनआरसीमध्ये नाही.

सर्व नागरिक, मग त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांना या यादीत स्थान आहे. एनआरसी ही स्वतंत्र प्रक्रिया आहे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक ही वेगळी प्रक्रिया आहे,’ असे अमित शहा यांनी स्पष्ट केले.

देशातील सर्व नागरिकांना एनआरसी यादीत स्थान मिळावे यासाठी ते संपूर्ण देशात लागू होणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post