भाजपचा अहंकार महाराष्ट्राने संपविला : नवाब मलिक


वेब टीम : मुंबई
राज्यात स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार केवळ ७८ तास तग धरू शकले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.

या घडामोडींनंतर महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राने त्यांचा अहंकार संपवला आहे.

हंगामी अध्यक्षांच्या माध्यमातून ऑन कॅमेरा बहुमत सिद्ध करता येणार नाही हे भाजपच्या लक्षात आलं.

त्यामुळेच फडणवीस यांनी राजीनामा दिला. हे गोवा, मणिपूर आणि कर्नाटक नाही हे शरद पवारांनी कालच सांगितलं होतं,’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post