महाराष्ट्रात मोहीम फत्ते, आता पुढील टार्गेट गोवा : संजय राऊत


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खा. संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यात महाआघाडीची मोट बांधणार्‍या नेत्यांमध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

’गोव्यातही भाजपाने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रानंतर आता मिशन गोवा असेल.

आताच माझे महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे नेते सुधीर ढवळीकरांशी बोलणं झालं आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

गोव्यासह संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाविरोधात शिवसेना राळ उठवणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत शेतकर्‍यांबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post