खुशखबर : पेट्रोल लवकरच स्वस्त होणार


वेब टीम : दिल्ली
पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकराच्या वतीनं पर्यावरण मंत्रालयाने हरियाणाच्या पानीपतमध्ये पेट्रोलियम इंधनच्या रुपात बायोमास इथेनॉल यंत्रसंच तयार करण्यासाठी इंडियन ऑइलला मंजूरी दिली आहे.

याबाबत पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेवर यांनी रविवारी माहिती दिली.

यावेळी जावडेवर यांनी, पर्यावरणपुरक इंधनच्या रुपात इथेनॉलच्या वापराला पुढाकार देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यात इंडियन ऑइलला च्या दुसर्‍या बायोमास आधारित इंधन 2जी इथेनॉल यंत्रसंच (2G Ethenol Plant) लावण्यासाठी आयओसीएलला पर्यावरण मंत्रालयानं मंजूरी दिली आहे.

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत, मला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आयओसीएलला पानीपतमध्ये नवीन 2जी इथेनॉल यंत्रसंच स्थापित करण्यासाठी मंजूरी दिली आहे, असे सांगितले.

तसेच, जावडेकर यांनी ही योजना पर्यावरणपुरक इंधन मिळण्यास फायदा होईल त्याचबरोबर शेतकर्‍यांना याचा फायदा होत दुप्पट वेतन मिळण्यास मदत होईल, असेही सांगितले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयओसीएलनं 100 किलोलीटर प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेले 2जी इथेनॉल यंत्रसंचासंबंधी रिपोर्ट पर्यावरण मंत्रालयाला पाठवले होते. त्याचा अभ्यास करून पर्यावरण मंत्रालयानं या प्रकल्पासाठी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post