वकील - पोलिसांनी एकमेकांना चोपले ; न्यायालयाच्या बाहेरच झाला राडा


वेब टीम : दिल्ली
दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस व वकिलांमधील वादाला हिंसक वळण लागले.

पोलीस कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी झालेल्या गोळीबारानंतर वकील भडकले व यानंतर पोलिसांचे वाहन पेटवले.

पोलिसांच्या गोळीबारामुळे एक वकील गंभीर जखमी झाल्याने संतप्त झालेल्या वकिलांनी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केल्याचे समजते.

याशिवाय न्यायालय परिसरातील बऱ्याच वाहनांची देखील तोडफोड केली आहे. हा वाद दिल्ली पोलीस व वकीलांमध्ये पार्किंगच्या मुद्यावरून उसळल्याचे समजते.

यानंतर या वादाला हिंसक वळण लागले. यावेळी काही माध्यम प्रतिनिधींना देखील मारहाण झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालय परिसराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस दल बोलावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post