कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा


वेब टीम : पुणे
चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.

कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

दक्षिणेकडून उत्तरेकडे 'महा' चक्रीवादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6 तारखेनंतर पुण्याला पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील 'महा' या चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसण्याची शक्यता असल्याचा अंजाजही हवामान खात्यानं दिला आहे.

त्यामुळे आधीच नुकसानीत अडकलेला शेतकरी आता पुढचे काही दिवस आणखी भरडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.

3, 4 आणि 5 नोव्हेंबरला पुणे शहरात पावसाची शक्यता नाही. पण 6 नोव्हेंबरनंतर पावसाला पुणे शहरात पुन्हा एकदा सुरुवात होईल.

तर 7 नोव्हेंबरला पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून महाराष्ट्र -गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्यानं केले आहे.

'महा' हे वादळ 40 ते 60 किलोमीटरच्या गतीनं उत्तरेकडे सरकत असून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर 8 ते 12 फूट उंचीच्या लाटांची शक्यता आहे.

त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post