'थलाईवा' उतरणार राजकारणात; नवीन पक्ष काढणार


वेब टीम : चैन्नई
चित्रपटसृष्टीत असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रजनीकांत लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. रजनीकांत पुढील वर्षात आपल्या नव्या पक्षाचीही स्थापना करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

रजनीकांत यांच्या प्रवेशामुळे तामिळनाडूमधील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर २०२० पर्यंत रजनीकांत आपल्या नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत. सध्या पक्षाच्या उद्दिष्टांवर काम अंतिम टप्प्यात सुरु आहे.

विशेष म्हणजे २०२१ मध्ये तामिळनाडूत होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही रजनीकांत आपल्या पक्षाचे उमेदवार उतरवणार आहेत, असे लेखक तमिलरुवी मनियान यांनी सांगितले.

दरम्यान, मनियान हे रजनीकांत यांच्या जवळचे मानले जातात. डीएमकेचे नेते एम करुणानिधी आणि एआयडीएमकेच्या महासचिव जयललिता यांचे निधन झाल्यानंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरुन काढण्यासाठी रजनीकांत नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत, असेही सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांना भाजपचे सहयोगी म्हटले जात होते. यानंतर ८ नोव्हेंबर रोजी रजनीकांत यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, माझे भगवेकरण कुणी करु शकत नाही.

दरम्यान, तामिळनाडूमधील चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार केंद्र सरकारकडे तामिळनाडूसाठी काही महत्त्वाच्या मागण्या करणार आहेत.

यामध्ये नदी जोड प्रकल्प, हायड्रोकार्बन प्रोजेक्ट रद्द करा, अशा मागण्यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post