भाजपचे राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडे


वेब टीम : मुंबई
सध्या तुरुंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडांचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे.

त्यांची नावं लवकच जाहीर करू; पण भाजपचे राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडे झाले असल्याचा आरोप शिवसेना नेता खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केला आहे.

सीबीआयच्या मदतीने ज्यानी सरकारे बनवली ते त्यांच्यावरच पलटली असल्याचे राऊत म्हणाले.

हरियाणासारख्या राज्याचा तिढा लवकर सुटतो; मात्र महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा तिढा अजून सुटत नाही हे रहस्यमय आहे.

भाजपचे राजकरण हे गुंडांपेक्षाही घाणेरडे आहे.

कर्नाटकातील येडीयुरप्पा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालणार नाही. सत्ता गेल्यानंतर माकडं आणि कुत्रंही बरोबर राहात नाही.

आता यापुढे फक्त मुख्यमंत्रिपदावरच बोलणे होईल, असेही राऊत म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post