मुख्यमंत्रीपदाचा अट्टाहास केल्यानेच भाजपवर ही वेळ : संजय राऊत यांचा टोला


वेब टीम : मुंबई
भाजपने सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपने भूमिका जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला टोला लगावला. ‘काळ संध्याकाळपर्यंत भाजपचे नेतृत्व त्यांचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत होते.

मात्र आता त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार? शिवसेनेला केलेल्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या वचनाचं पालन करायचं नाही आणि मुख्यमंत्रिपदाचा अट्टहास यामुळे भाजपवर ही वेळ आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post