ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते : राऊत


वेब टीम : मुंबई
राज्यातील सत्तेवरुन रंगलेला कलगीतुरा शांत व्हायची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, ‘ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते’ असं वक्तव्य केलं आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, ‘महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते.

मुख्यमंत्रीपदासह सर्व पदांचं समसमान वाटप झालं पाहिजे’ अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

‘सत्तेत समसमान वाटा हवा अन्यथा शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते आणि आपला मुख्यमंत्रीही बसवू शकते,’ असा दावाही त्यांनी केला.

आम्ही काँग्रेससोबत जाऊ असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंनी देखील आमदारांच्या बैठकीत असं काही सांगितलेलं नाही.

 काही चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हणलं आहे.

 त्यांनी जर तसं म्हणलं आहे तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल यात काही शंका नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post