वेब टीम : मुंबई शेअर बाजारात मागच्या तीन दिवसांपासून तेजीचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी दिवसा अखेरीस १९९ अंकांच्...
वेब टीम : मुंबई
शेअर बाजारात मागच्या तीन दिवसांपासून तेजीचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी दिवसा अखेरीस १९९ अंकांच्या वाढीसह ४१,०२०.६१ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६३ अंकांच्या वाढीसह १२,१०० अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स आज दिवसभराच्या ट्रेडिगमध्ये २५४.४६ अंकांची उसळी घेऊन ४१,०७५.७६ अंकांवर पोहोचला.
सेन्सेक्स मंगळवारी दिवसअखेरीस ४०,८२१.३० पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सत्रात १२ हजारांचा टप्पा गाठला.
दिवसअखेर निफ्टी १२,०३७.७० वर स्थिरावला.निफ्टी बुधवारी ६३ अंकांच्या वाढीसह १२,१०० वर बंद झाला. बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्राच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसली.
COMMENTS