भाजपची ऑफर स्वीकारून शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावे : आठवले


वेब टीम : मुंबई
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीचा आग्रह शिवसेनेने धरला आहे. मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ती मागणी फेटाळून लावली आहे.

त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठीचा आग्रह सोडण्याचा सल्ला दिला आहे.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत शिवसेनेचं मत साध्य होणार नसल्याचंही  आठवले यांनी म्हटलं.

आदित्य ठाकरे यांना अनुभव कमी आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहू नये, असंही आठवले म्हणाले.

शिवसेनेने भाजपसोबत जायला हवं. भाजपच्या ऑफर स्वीकारून शिवसेनेने सत्तेत यावं. तसंच, शिवसेनेने काँग्रेससोबत जाणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले.

युतीच्या सरकारला जनतेने बहुमताने निवडून दिले. तरीदेखील युतीमध्येच मुख्यमंत्रिपदावरून आणि काही खातेवाटपावरून भाजप-शिवसेनेत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अद्यापही राज्यात सत्तास्थापन होऊ शकली नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post