भारताच्या 'या' लढाईत श्रीलंका राहणार सोबत


वेब टीम : दिल्ली
श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत.हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची आज (शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा पार झाली. यावेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह बऱ्याच मुद्यांवर चर्चा झाली.

यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत सर्वप्रकारे दहशतवादाचा विरोध करत आहे व दहशतवादाविरोधातील आमची लढाई सुरूच राहील. या लढाईत भारत श्रीलंकेला साथ देत राहील, असे सांगितले.

या प्रसंगी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी देखील स्पष्ट केले की,दहशतवाद विरोधातील लढाईत आम्हाला भारताची साथ मिळालेली आहे.

आम्हीपण सर्वच मुद्यांवर भारताबरोबर आहोत. भारताबरोबचे आमचे संबंध अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भारतीय उपखंडात शांतता रहावी यासाठी सुरक्षेच्या मुद्यावर भारताबरोबर आम्ही काम करणार आहोत.

तसेच,द्विपक्षीय बैठकीत मच्छिमारांबाबतही बरीच चर्चा झाली. मासेमारी करताना अनेकदा मच्छिमार भटकत श्रीलंकेच्या हद्दीत पोहचतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post