महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार स्थापन होईल


वेब टीम : मुंबई
राज्यातला सत्तेचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच नेत्यांच्या वक्तव्यांमुळे नवनव्या चर्चांना उधाण येत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘कोणत्याही क्षणी गोड बातमी येईल. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार स्थापन होईल,’ असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील यात दुमत नाही. बैठकीत एक प्रस्ताव ठरलेला आहे, मात्र तो माध्यमांसमोर जाहीर न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

 आम्ही शिवसेनेची वाट पाहू. सरकार आमचंच असेल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post