उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, याला सर्वसंमती : शरद पवार


वेब टीम : मुंबई
राज्यातला सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

तसंच शनिवारी तिन्ही पक्षांशी एकत्रित पत्रकार परिषद होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर पवारांनी माध्यमांना हि माहिती दिली.

‘मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आम्ही पुढे केलं आहे. तिन्ही पक्षांनी यासाठी संमती दर्शवली आहे. नेतृत्त्व कोणी करायचं हा आमच्या समोरचा अजेंडा नाही.

हे सरकार चाललं पाहिजे यासाठी आम्ही चर्चा करत आहोत. पत्रकार परिषदेत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल’ असं शरद पवार यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post