मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे घेणार शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राला सत्तापेच अखेर सुटला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे नेते म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव मांडला.

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले.

उद्धव ठाकरे येत्या १ डिसेंबरला शिवाजी पार्कवर शपथ घेतील अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post