अश्रू व घाम यांची चव खारट का असते? कारण जाणाल तर हैराण व्हाल


वेब टीम : मुंबई
घाम वा अश्रू खारट लागतात. याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. खूप रडल्यानंतर डोळ्यातून काही अश्रू अश्रूपिंडातून नाकाच्या पोकळीत व तेथून घशात येतात.

खारट चव लागते. घामातील मिठाची कल्पना तुम्हाला उन्हाळ्यात येईल. उन्हाळ्यात खूप घाम येतो.

घामाने कपडे ओलेचिंब होतात. वाळल्यानंतर कपड्यावर घामाचे क्षारयुक्त डाग पडतात. कधी कपड्यांवर हात फिरवल्यास क्षाराचा थर लागतो.

शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी घामाचा उपयोग होतो.

डोळ्यातील आवरण, नेत्रपटल हे भाग कोरडे होऊ नयेत; धूळ वगैरे गेल्यास ती वाहून डोळे स्वच्छ व्हावे; यासाठी अश्रू खूप उपयोगी ठरतात.

अश्रू व घाम या दोहोंमध्ये सोडियम क्लोराईड हा क्षार असल्याने (मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड) ते खारट लागतात.

हगवणीवर घरगुती उपाय म्हणून मीठ, साखर व पाणी यांचे द्रावण तयार करून ते पाजायला सांगतात.

या द्रावणाची चव अश्रूंच्या इतकी खारट लागावी, असे सांगण्यात येते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post