बुलढाणा : आकाशातून पडले यंत्र; नागरिकांमध्ये घबराट


वेब टीम : देऊळगाव राजा
देऊळगाव राजा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम कुंभारी शिवारामध्ये बालू खांडेभराड यांच्या शेतामध्ये अवकाशातून एक यंत्र आज सकाळी दिसून आला.

त्या यंत्रांमध्ये एक मोठ्या प्रकारचा बलून फुगा होता व त्याखाली काही इलेक्ट्रॉनिक सामग्रीचे सर्किट असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रथम घबराटीचे वातावरण तयार झाले होते.

सदर घटनेबाबत ग्राम कुंभारी येथील काही नागरिकांनी पोलिस स्टेशन देऊळगाव राजा यांना माहिती देऊन सदर प्रकार सांगितला. ही घटना दिनांक 22 रोजी सकाळी सात

साडेसातच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. यावेळी कुठल्या प्रकारचे यंत्र आहे किंवा दुसरा काही प्रकार आहे अशा संभ्रमात परिसरातील नागरिक शेतकरी होते मात्र सदर घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर, तलाठी देशपांडे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन सदर यंत्राची तपासणी केली.

त्यानंतर सदरचे यंत्र पोलीस आणि महसूल विभाग यांनी पंचा समक्ष ताब्यात घेऊन स्थानिक नागरिकांचा संभ्रम दूर केला. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तलाठी देशपांडे यांना विचारणा केली असता सदर चे यंत्र पर्जन्यमापक यंत्र असू शकते, हवामान खात्याचा अंदाज घेण्यासाठी अशा प्रकारचे यंत्र बलून किंवा फुग्या द्वारे अवकाशात सोडण्यात येते.

याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, पुढील कार्यवाही आणि या यंत्राबाबत सविस्तर माहिती प्रशासन घेत आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post