बांगलादेशला व्हाईटवॉश: भारताचा १ डाव ४६ धावांनी विजय


वेब टीम : कोलकाता
कोलकाता कसोटीत शुक्रवारी नाणेफेक हरल्यानंतर भारताने आधी क्षेत्ररक्षण करताना बांगलादेशला १०६ धावांत बाद केले होते. नंतर भारताने ९ बाद ३४७ वर डाव घोषित केला.

यात विराट कोहलीचे शतक आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी बांगलादेशाची धावसंख्या होती ६ बाद १५२. तिसऱ्या दिवशी बांगलादेशाचा संघ १९५ धावांत बाद झाला. दुसऱ्या डावात भारतातर्फे उमेश यादव याने ५ गडी बाद केले.

ईडन गार्डन्सवरील बांगलादेशविरुद्धचा सामना १ डाव ४६ धावांनी जिंकून भारताने लागोपाठ चार कसोटी सामने डावाने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

हा सामना जिंकून भारताने मालिकाही २- ० ने जिंकली आहे. इंदूर येथे याआधी झालेला बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने १ डाव १३० धावांनी जिंकला होता. भारताने लागोपाठ १ डावाने जिंकलेले कसोटी सामने –

दक्षिण आफ्रिका १ डाव १३७ धावा (पुणे), दक्षिण आफ्रिका १ डाव २०२ धावा (रांची), बांगलादेश १ डाव १३० धावा (इंदौर) आणि बांगलादेश १ डाव ४६ धावा (कोलकाता). 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post