अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला : संजय राऊत


वेब टीम : मुंबई
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला, बंडखोर आमदांना रस्त्यावर फिरु देणार नाही. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

राऊत म्हणाले की, अजित पवार यांची देहबोली संशयास्पद होती, या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

अजित पवार हे कालच्या बैठकीत डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हते. बैठक सुरु असतांना अचानक वकिलाला भेटायचं म्हणून ते निघून गेले होते. आज शपथविधी झाल्यावर कळालं की कोणत्या वकिलाला ते भेटायला गेले होते.

दुपारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असून, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचेही राऊत 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post