अजित पवारांकडून दिशाभूल; भाजपसोबत जाणार नाही : शरद पवार


वेब टीम : मुंबई
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्वीट अजित पवारांनी केलं होतं.

या ट्वीटमुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. खुद्द शरद पवार यांनी हा संभ्रम ट्विट करून दूर केला आहे. शपथविधी झाल्यानंतर आज अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टीव झालेले पाहायला मिळाले. अजित पवार यांनी ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्व भाजप नेत्यांचे आभार मानले आहे.

अजित पवारांनी ट्विटमध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असे लिहिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही त्यांनी  ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

त्यावर ट्विट करून शरद पवारांनी संभ्रम दूर केला आहे. ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, "भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post