कर्नाटक एक्स्प्रेसची धडक; महिलेचा मृत्यू


वेब टीम : अहमदनगर 
नगर रेल्वे स्टेशनजवळ मंगळवार (दि.10) रोजी कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसून 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिस स्टेशनला सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

या घटनेतील मृत महिलेची ओळख न पटल्याने रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन करुन तपास सुरु केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक सी.एल.देशमुख हे करीत आहेत.

या महिलेची ओळख पटून सदर महिलेचे नाव जयश्री अशोक भिटे (वय 38, रा.तागडवस्ती, भिस्तबाग चौक परिसर, पाईपलाईन रोड) असे असल्याचे समजले.

मात्र याप्रकरणी जयश्री भिटे यांची आत्महत्त्या नसून त्यामागे काहीतरी घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post