धनंजय मुंडे यांनी मंत्री होऊन भगवान गडावर आशीर्वादासाठी यावे : महंत नामदेव शास्रींनी घेतली भेट


वेब टीम : मुंबई
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.

धनंजय मुंडे यांनी स्वतः याबाबत फेसबूक अकाऊंटवर फोटोसह पोस्ट केली आहे.

‘साधू संत येती घरा असे म्हणताना..महंतानी आपण मंत्री झाल्यावर गडावर येऊन वैकुंठवासी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत, अशी आज्ञा केली असा उल्लेख आहे.

महंत नामदेव शास्त्री पंकजा मुंडेना भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या विरोधानंतर चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा नामदेव शास्त्री चर्चेत आले आहेत.

विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना गडावर राजकारणाच्या चपला बाहेर काढून या, असे म्हणणारे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यावर गडावर पुन्हा या असे म्हणणे यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post